(दापोली)
तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल येथे मंगळवारी कोळबांद्रे केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मुख्याध्यापक, श्रीम.भक्ती सांवत यांचे अध्यक्षतेत उत्साहात संपन्न झाली. प्रास्ताविक संजय मेहता यांनी करत दिवसभर चालणार्या परिषदेतील विषयांसंदर्भात माहिती दिली.
तद्नंतर CRG/BRG सक्षमीकरण करणे या बद्दल संतोष माने यांनी तर विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेचा अविष्कार करणे विषयी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात आत्मविश्वास कसा निर्माण करावा यांची माहिती देत असतांना मार्गदर्शक संजय मेहता यांनी LSRW, How to develop speaking English, ऐकाल तर बोलाल आणि लिहाल, हे करीत असतांना शिक्षकांनी स्वत:ची तंत्रे वापरली पाहिजेत असे सांगितले. तद्नंतर स्वच्छता माॅनिटर गरज आणि कृती सांगतांना मनोहर सनवारे यांनी सातत्याने स्व:च्छता होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांकरवी शाळा,गाव कसे स्वच्छ राहिल याची दक्षता घेऊन स्वच्छता राखूया असे मत व्यक्त केले. यानंतर. अध्ययनस्तर निश्चित्ती का,कशी करावी हे सांगूण आपला विद्यार्थी कुठे आहे हे समजते, मग आपण त्यावर उपाययोजना करु शकतो हे महेश शिंदे यांनी सांगितले. शेवटी, पावसाळ्यातील आजार व उपाय या विषयी सखोल मार्गदर्शन नेहा उकसकर यांनी केले.
प्रशासकिय कामकाजाविषयी केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी मार्गदर्शन केले. तद्नंतर सेवानिवृत्त शिक्षक यासिन मियाॅं ऐनरकर यांना केंद्रामार्फत भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संदेश चव्हाण, महेश शिंदे, समीर ठसाळ, महेंद्र कलमकर, प्रमोद तेवरे,संजय मेहता, संजय जंगम यांनी मीत भाषी; पण सर्वांगसुंदर व्यक्तीमत्व, आदर्श शिक्षक, प्रसिध्दीपेक्षा विद्यार्थ्यांच्या ह्ृदयात राहणारे आदर्श शिक्षक ऐनरकर यांचेबद्दल मनोगते व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदकुमार कालेकर यांनी केले. यावेळी महेंद्र कलमकर, संजय मेहता, शामराव वरेकर, मनोहर सनवारे, संजय मेहता, यासिनमियाॅं ऐनरकर, प्रा.सुनिता सावंत आदि. उपस्थित होते. व्यवसाय आणि विद्यार्थी यांना देवता माणून काम केल्याचे ऐनरकर यांनी सत्कार प्रसंगी सांगीतले. शेवटी महेंद्र कलमकर यांनी आभार व्यक्त केले.