(खेड / प्रतिनिधी)
खेड शहरातील महाड नाका परिसरात असलेली धोकादायक जीर्ण हमदुले इमारत मंगळवारी सांयकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास जमीनदोस्त झाली. सुदैवाने खेड नगर परिषदेने इमारतीबाबत आधीच धोकादायक असल्याचे सांगितल्याने कोणीही राहत न्हवते.
धोकादायक इमारत कोसळतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या इमारतीमध्ये कोणी रहिवाशी नसल्याने येथील नागरिकांसह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला. अली हुसैन बिजले (रा. खेड) यांच्या मालकीची असलेली इमारत मोडकळीस आली होती. याबाबत नगर प्रशासनाकडून ही इमारत धोकादायक असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही इमारत खाली करून कोणी ही राहू नये अशी नोटीस देखील बजावली होती.
दरम्यान गेले चार दिवसांपासून मान्सून सक्रिय झाल्याने पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मंगळवारी ही इमारत अखेर जमीनदोस्त झाली. या घटनेनंतर खेड नगर परिषदेतचे अधिकारी तसेच मनसे नेते वैभव खेडेकर हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेचा व्हिडिओ Ratnagiri 24 न्यूजच्या You Tube चॅनलवर पाहायला मिळेल.
लिंक – https://youtube.com/shorts/gpoJc_XamFM?si=7_hv804RQeZtk6C2