(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी व तालुका शाखा दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ऑक्टोबर २०२४ पासून माता रमाई आंबेडकर राष्ट्रीय स्मारक वणंद दापोली येथे विजय जाधव जिल्हा संस्कार विभाग प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या बौद्धाचार्य,श्रामणेर शिबिराचा सांगता समारंभ ५ नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात आला.
प्रारंभी श्रामणेर संघाचे संघनायक पुज्य भन्ते बोधीरत्नजी व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलीत करण्यात आले.त्यानंतर पुज्य भन्ते यांनी उपस्थितांना त्रिशरणं पंचशील देवून धम्मदेसना दिली. यावेळी अनंत सावंत,एन.बी.कदम, विजय जाधव, कल्पेश सकपाळ यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विजय कांबळे, संजय कांबळे,अनिल घाडगे, टी.एस.मोरे, सुनील धोत्रे, अ.के.मोरे, विद्याधर कदम, अशोक जाधव,अनंत जाधव, दिलीप मोहिते, साहिल घाडगे, दिपक धोत्रे, पवन धोत्रे, अमोल धोत्रे उपस्थित होते. यानंतर शिबिरात सहभागी झालेल्या शिबीरार्थींना पूज्य भन्ते बोधीरत्नजी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अल्पेश सकपाळ यांनी केले व सरणत्तेय घेऊन कार्यक्रमाचा सांगता समारंभ उत्साहात करण्यात आला.