(खेड)
गेले दोन दिवस संततधार पावसामुळे तालुक्यातील शिरवली येथील प्राथमिक शाळेच्या एका वर्ग खोलीचेचे छत सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोसळले. सुदैवाने यादुर्घटनेत शाळा सुटली असल्यामुळे या ठिकाणी मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला. दुर्घटनाग्रस्त झालेल्या खेडमधील शिरवली जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा १९५४ मध्ये बांधली गेली असल्याची माहिती देण्यात आली. आज ७० वर्ष होऊन देखील या शाळेसाठी कोणत्याही प्रकारचा निधी खर्च पडला नाही अशी माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली.
गेल्या दोन वर्षापासून ही शाळा मोडकळीस आल्याबाबतचे पत्र ग्रामस्थांकडून गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले जात होते मात्र दुरुस्तीच्या कामासाठी देखील शासनाकडून निधी न आल्यामुळे अखिल सोमवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली योग्य वेळी दुरुस्ती देखभाल झाली असती तर आज ही शाळा पडली नसती असे शिरवली गावातील जेष्ठ ग्रामस्थ वसंत गुरव म्हणाले. या शाळेत पहिली ते सातवी वर्ग असून एकूण २८ पटसंख्या आहे. सोमवारी मुसळधार पावसात शाळा सुटल्यानंतर लगेच छत कोसळले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी घाबरलेल्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
पालकांकडून निवेदन
याबाबत पालकांनी आज मंगळवारी बेट पंचायत समिती गातून सखेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शाळेच्या इमारतीचे उर्वरित छत देखील मुसळधार पावसात केव्हाही पडू शकते याची भीती व्यक्त करत तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता जोपर्यंत विद्याथ्यांना सुरक्षित पर्याय व्यवस्था होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्या शाळेत पाठवले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला व त्याबाबतचे निवेदन देखील देण्यात आले