(चिपळूण)
चिपळूण तालुक्याची उर्दू शिक्षण परिषद एच्.एम्.परकार प्राथमिक शाळेत गट समन्वयक अशफाक पाते यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात कालुस्ते कन्या उर्दू शाळेचे शिक्षक अब्दुल कादिर तांबे यांच्या कुराण पठणाने झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात हम्द आणि नआत गायनाने झाले. मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींचे गट सहाय्यक शौकत कारविणकर सरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
एच्. एम्. परकार शाळेचे मुख्याध्यापक अ. समद पटेल यांनी अध्ययन निष्पत्ती आधारित विद्यार्थ्यांची कार्यक्षमता पडताळणीचे उत्तम सादरीकरण केले. मानसिक आरोग्य व स्वास्थ या विषयावर डाॅक्टर जानवलकर यांनी उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या आहारात कोणते पदार्थ जास्त असावेत. कोणते पदार्थ नसावेत. या सह आपल्याला दररोज किमान २० ते २५ मिनिटे योगा करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्या बाबत नेहमी सतर्क रहाण्या बाबत ही आवाहन केले. कालुस्ते हायस्कूल चे ख्वाजा कडप्पा सर यांनी अतिशय आनंदी वातावरणात वीरगाथा या बाबत सखोल अभ्यासपूर्वक माहिती दिली. उल्लास नवभारत साक्षरता मेळावा आयोजित करुन त्याच्या अंतर्गत साक्षरता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे हे उद्देश ठेऊन साक्षरता दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करावे अशा प्रकारे फोफळी उर्दू शाळेच्या शिक्षिका निलम दळवी यांनी उत्तम मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात शाळेची यशोगाथा पिंपळी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शराफत फकीर यांनी उत्तम उत्तम प्रकारे सादर करुन शालेय शैक्षणिक दर्जा कसा वाढवण्यासाठी कसे प्रयत्न केले आहेत या बाबत सविस्तर माहिती दिली. कान्हे उर्दू शाळेचे शिक्षक शैलेश कुळे यांनी उत्तम इंग्रजी विषयाचे बळकटी करण्या बाबत अनेक शैक्षणिक साधनाद्वारे माहिती दिली. त्यानंतर गट समन्वयक अशफाक पाते सर यांनी जी. आर. वाचन करून उत्तम मार्गदर्शन केले.
शेवटी मार्गदर्शन करणाऱ्या तज्ञ मार्गदर्शकांचे तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक वेळीच उपस्थित राहिले. त्या सर्वांचे वाघिवरे हायस्कूल चे शिक्षक दानिश साबळे यांनी मन:पूर्वक आभार मानले.