(रत्नागिरी)
शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथील जंगलमय भागात गावठी दारु विक्री करणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार १६ जून रोजी सायंकाळी ५ वा. करण्यात आली. महेंद्र रवींद्र जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल शरद कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा पाटीलवाडी येथील जंगलमय भागात नदीकिनारी आंब्याच्या झाडाच्या आडोशाला गावठी हातभट्टीची ५५० रुपयांची ५ लिटर दारूविक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.