(रत्नागिरी)
शहरानजीकच्या खेडशी नाका येथे चायनीज सेंटरच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी बसलेल्या प्रौढाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार, २१ जुलै रोजी रात्री ८.१५ वा. करण्यात आली. अशोक गोपाळ पुनसकर (५२, मुळ रा. पडवे गुहागर सध्या रा. खेडशी नाका) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पूनसकर याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री तो खेडशी नाका येथील एका चायनिज सेंटरच्या बाजुला समोर १८० मिली दारुची बाटली ठेवून पिण्यासाठी बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.