मुंबई गोवा महामार्गावर माणगांव शहराजवळील मानस हॉटेल समोर शिवशाही बस व रिक्षामध्ये भीषण अपघात होऊन रिक्षामधील ३ जण मयत झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, आज (दि. ७ एप्रिल) रोजी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास मानस हॉटेल जवळ शिवशाही बस क्र. एम एच ०९ एफ एल ०२४६ ही ठाणे वरून दापोलीकडे जात असताना रिक्षा क्र. एम एच ०४ एफ सी ६२८२ मध्ये भीषण अपघात झाला.
प्राथमिक वृत्तानुसार, ठाण्याहून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावजवळ आली असता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात एवढा भीषण होता की, धडकेत रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून बसचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाल्यामुळे धडकेची तीव्रता स्पष्ट होत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपस करत आहेत.
या अपघातात रिक्षामधील प्रवीण अनंत मालुसरे, दत्तात्रय नारायण वरंदेकर, गणेश बाबू जाधव सर्व राहणार ठाणे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस टीम पो. ह. गणेश समेळ, सानप घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मयत यांना उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आणण्यात आले असून यावेळी सुरक्षारक्षक विवेक नितनवरे, नागेश दिपके यांनी सहकार्य केले. या घटनेचा पुढील तपास माणगांव पोलीस करीत आहेत.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !