(जाकादेवी / वार्ताहर)
जिल्हास्तरीय शालेय टेनिस स्पर्धा कै. डॉ. नानासाहेब मयेकर क्रीडांगण मालगुंड येथे १४ वर्षाखालील मुलगे व मुली आणि १७ वर्षाखालील मुलगे व मुली शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत जाकादेवी विद्यालयाचा १४ वर्ष वयोगटातील संघ विजेता ठरला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी, डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन यांच्या तसेच प्रशासकीय तांत्रिक व आर्थिक सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १४ वर्षाखालील मुली या वयोगटात प्रथम विजेता म्हणून ब. प. विद्यालय व भाई मयेकर जुनियर कॉलेज, मालगुंड रत्नागिरी. तसेच १४ वर्षाखालील मुलगे या वयोगटात प्रथम विजेता म्हणून तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवी रत्नागिरी, द्वितीय विजेता मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी आणि तृतीय विजेता ब. प. विद्यालय व भाई मयेकर जुनियर कॉलेज, मालगुंड रत्नागिरी.
तसेच १७ वर्षाखालील मुली या वयोगटात प्रथम विजेता म्हणून माध्यमिक विद्यालय वरवडे रत्नागिरी, द्वितीय विजेता म्हणून पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी आणि तृतीय विजेता म्हणून ब. प. विद्यालय व भाई मयेकर जुनियर कॉलेज मालगुंड रत्नागिरी. तसेच १७ वर्षाखालील मुलगे प्रथम विजेता म्हणून पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी, द्वितीय विजेता म्हणून तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवी रत्नागिरी आणि तृतीय विजेता म्हणून नॅशनल इंग्लिश स्कूल रानतळे राजापूर या सर्व शाळांना डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन मालगुंड यांच्या सौजन्याने आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा सचिव सिद्धेश गुरव यांनी दिली.
सामने संपल्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन मालगुंड यांचे सर्व पदाधिकारी, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, सर्व क्रीडा प्रेमी, खेळाडू, प्रशिक्षक, प्रमुख मान्यवर तसेच पंच यांचे टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी कडून आभार मानण्यात आले.स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व संघांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आयोजक यांनी अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.