(चिपळूण)
शिक्षक भारतीच्या जिल्हा, तालुका पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या रविवारी खेर्डी, चिपळूण येथे पार पडलेल्या नियोजित जिल्हा सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा कार्यकारिणीची निवड मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेमध्ये सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, पाचल, तालुका राजापूर या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय पाथरे यांची जिल्हाध्यक्ष, चिपळूणच्या नायशी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक राजेश माळी यांची जिल्हा कार्याध्यक्ष आणि भाईशा घोसाळकर हायस्कूल कडवईचे ज्येष्ठ शिक्षक व विद्यमान जिल्हा कार्यवाह निलेश कुंभार यांची जिल्हा सचिवपदी फेर निवड करण्यात आली आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान जिल्हाध्यक्ष ध.ना. पाटील होते. प्रथमता सभासदांच्या मृत झालेल्या नातेवाईकांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर जिल्हा कार्यकर्त्यांच्या सभेला सुरुवात झाली. जिल्हा कार्यवाह निलेश कुंभार यांनी सर्वांचे स्वागत करून संघटनेच्या कार्याचा आढावा सादर केला. यानंतर सभेच्या अजेंठ्यानुसार जिल्हा कार्यकर्त्यांची निवड करण्यासाठी विविध सभासदांनी केलेल्या सूचना विचारात घेण्यात आल्या. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
सदर जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष – संजय पाथरे,पाचल
कार्याध्यक्ष – राजेश माळी, नायशी चिपळूण
उपाध्यक्ष – श्री शिवाजी बनगर,राजापूर, श्री राजेश मोहिते गुहागर, श्री पोपटराव जगताप तळे, खेड
जिल्हा सचिव – निलेश कुंभार कडवई संगमेश्वर
सहसचिव – शिवाजी पांढरे, नाणीज रत्नागिरी
कोषाध्यक्ष – निलेश बागडी लांजा
मुख्य जिल्हा संघटक- मुबीन बामणे हर्णे,दापोली
जिल्हा संघटक- शिवाजी शिंदे चिपळूण, किरण गोंजारे पाली रत्नागिरी, सत्यवान धोत्रे खेड, मिलिंद कडवईकर संगमेश्वर, सचिन दहिभाते मंडणगड, अमित कदम मुरडे खेड
जिल्हा कार्यकारिणी सदस्य- मुख्या संदीप पाटील खेड, मुख्या. सुशांत राईन लांजा, रियाज म्हैसाळे दापोली, पोपटराव साळुंखे गुहागर, इलियाज सत्तार मंडणगड, लालसाब मुलानी संगमेश्वर
राज्य प्रतिनिधी – ध.ना. पाटील खेड, निलेश कुंभार संगमेश्वर
प्रमुख सल्लागार – ध.ना. पाटील खेड, सुभाष जाधव चिपळूण, रुपेश पंगेरकर रत्नागिरी
नूतन कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचे उपस्थित सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी महिला आघाडीतील सदस्यांची निवड नूतन कार्यकारिणीच्या पुढील सभेमध्ये करण्यात ठरविण्यात आले. या निवडीनंतर संघटनेपुढील विविध विषयावर सविस्तर विचार करण्यात आला. लवकरच नूतन जिल्हा कार्यकारिणीची सभा घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित समस्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले.