रत्नागिरी )
देशातील अग्रगण्य वाहन निर्माते टाटा मोटर्स आणि त्यांचे भारतातील अग्रगण्य डीलर नेटवर्क एस.पी. ऑटोहब यांचे रत्नागिरी येथील सर्व सुविधायुक्त वातानुकुलीत शोरूममध्ये आज धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर 1111व्या गाडीचा डिलिव्हरी सोहळा आनंददायी आणि उत्साहपूर्व वातावरणात संपन्न झाला.
अल्पावधीतच टाटा मोटर्स रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांनी एक मोठे यश संपादन केले आहे. ग्राहकांनी आमच्यावर आणि टाटा मोटर्सवर दाखविलेला विश्वास हा आम्हाला उत्स्फूर्त करणेस फार मोलाचा आहे. भविष्यात ग्रहकाभिमुख सेवा देणेकरिता आम्ही कटीबद्ध राहू असे आश्वासन श्री. अरुण देशपांडे यांनी वार्ताहरांशी बोलताना दिले आहे.
संपूर्ण दिवस सुरु असलेल्या सदर कार्यक्रमामध्ये अनेक ग्राहकांनी शोरूमला भेट दिली. संपूर्ण स्वदेशी अभियान अंतर्गत टाटा मोटर्सच्या वाहनांना मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे. जुनी कार देऊन नवीन कार घेणाऱ्या ग्राहकांचा अतिरिक्त लाभ करण्याच्या दृष्टीने आकर्षक एक्सचेंज बोनस देखील जाहीर करण्यात आला आहे.
टाटा मोटर्स ची सर्व वाहने ही ग्लोबल एन कॅप अंतर्गत ४ स्टार आणि ५ स्टार सेफ्टी रेटिंग युक्त असून ४ स्टार चाईल्ड सेफ्टी रेटिंग केवळ टाटा वाहनांमध्ये असलेने ही कार संपूर्ण कुटुंबाकरिता सेफ्टीच्या दृष्टिकोन मधून अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कार खरेदी करतेवेळी ग्लोबल एन कॅप रेटिंग विषयी नेट वर माहिती घेऊनच निर्णय घेणे हितावह ठरणार आहे.
सोबत १००% ऑन रोड फायनान्स, सर्वात कमी व्याजदर, ७ वर्ष कर्ज मुदत, खास शेतकरी बांधव करिता ७/१२ आणि ८अ वर कर्ज सुविधा आणि सहामाही ईएमआय अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एस.पी. ग्रूप ने गोवा, गुजरात, राजस्थान येथील अभूतपूर्व अशा यशानंतर महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा द्वारे प्रवेश केला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुशिक्षित सेल्स आणि सर्व्हिस ने परिपूर्ण असे रत्नागिरी मधील सर्वात मोठे असे वातानुकूलित शोरुम ग्राहकांच्या सेवेकरिता उपलब्ध करून दिले आहे. टाटा कार श्रेणी अंतर्गत येणाऱ्या टियागो टिगोर पेट्रोल आणि सी.एन.जी. नेक्सोन पेट्रोल, डिझेल आणि सी. एन. जी.,पंच , अल्त्रोझ, प्रीमियम एस. यू.व्ही मध्ये 7 सीटर टाटा सफारी आणि हॅरिअर ही सर्व वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नुकतीच टाटा ने अल्ट्रोज़ ही प्रीमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये कार आणि पाठोपाठ पंच आणि नेक्सऑन ट्वीन सिलेंडर सी.एन.जी.मध्ये उपलब्ध करून दिली असल्याने सदर दोन्ही कार चे बुकिंग ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या आनंदाच्या प्रसंगी विशाल शेलटकर, राकेश विलणकर, योगेश तांबे आणि निरंजन अनवल उपस्थित होते. ग्राहकांनी अधिक माहिती करिता आमचे नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा आणि टाटा कार च्या संपूर्ण स्वदेशी अभियानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन अरुण देशपांडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.