(तरवळ / अमित जाधव)
प्रसिद्ध आणि जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे मार्फत तालुकास्तरीय पाठांतर स्पर्धा रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी संस्थान श्री देव गणपतीपुळे चे भक्तनिवास येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली.
दरवर्षी या स्पर्धा संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या मार्फत आयोजित केल्या जातात तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत असतात. सदर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ देवस्थानचे सरपंच डॉ श्रीराम केळकर यांच्या हस्ते तसेच पंच विनायक राऊत, सचिव विद्याधर शेंडे, खजिनदार अमित मेहंदळे, पंच निलेश कोल्हटकर, श्रीहरी रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सदर पाठांतर स्पर्धा ही इयत्ता पहिली ते बारावी वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती, सहा गटात झालेल्या या स्पर्धेत सुमारे २००विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. दुपारी २ वाजता या सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता, या बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून फाटक हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक प्रकाश सोहनी उपस्थित होते. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पेन देण्यात आले, व या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख रुपये देऊन गौरविण्यात आले. पहिल्या तीन गटातील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रू १२५१, रू १००१, रू ७५१, तसेच उर्वरित तीन गटातील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रू १७५१,रू१५०१, रू १२५१अशी भरघोस बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंच विनायक राऊत यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांनी पाठांतरावर जास्तीत जास्त भर द्यावा व येणाऱ्या काळामध्ये अभ्यासा बरोबर अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या मार्फत दर वर्षी यातालुकास्तरीय पाठांतर स्पर्धांचे नेटके आयोजन करण्यात येते, तसेच सदर स्पर्धेची सर्व व्यवस्था अतिशय सुरेख केलेली असते.
या पाठांतर स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी, पहिला गट विषय होता, श्री गणपती स्तोत्र एकून सहभागी विद्यार्थी ४९ त्यामध्ये प्रथम क्रमांक अभिजित अजित पालकर (कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी), द्वितीय क्रमांक शुभ्रा संतोष आरावकर (कृष्णाजी चिंतामणी आगाशे प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी), तृतीय क्रमांक ईश्वरी सौरभ केळकर (जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं १)
गट दुसरा इयत्ता तिसरी ते चौथी विषय होता मनाचे श्लोक ५१ते ६० सहभागी झालेले विद्यार्थी ४० आणि या मध्ये प्रथम क्रमांक गौरांग विनयकुमार आजगेकर (कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी), द्वितीय क्रमांक शुभ्रा दिपेश निवेंडकर (जी. प. पु. प्रा शाळा निवेंडी खालची) तृतीय क्रमांक श्रीनिधी अतुल रानडे (जी. प. प्रा.शाळा गणपतीपुळे)
गट तिसरा पाचवी ते सहावी विषय होता मनाचे श्लोक १६१ते १८० सहभागी झालेले विद्यार्थी २५या मध्ये प्रथम क्रमांक धैर्य नरेंद्र गवाणकर (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), द्वितीय क्रमांक वल्लरी विनायक मुकादम (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), तृतीय क्रमांक दुर्वा योगेश सुर्वे (ब. प. विद्यालय मालगुंड),
गट चौथा सातवी ते आठवी विषय होता शिवस्तुती सहभागी झालेले विद्यार्थी २६आणि या मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तो श्रीराज राकेश ओक (ब. प.विद्यालय. मालगुंड) द्वितीय क्रमांक विदुला जितेंद्र मुळ्ये (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), तृतीय क्रमांक दीक्षा शाम शिंदे (ता मु मा विद्यालय जाकादेवी),
गट पाचवा नववी ते दहावी विषय होता रामरक्षा सहभागी झालेले विद्यार्थी होते २६आणि या मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तो वैदेही विवेक वैद्य (माध्यमिक विद्यालय वरवडे), द्वितीय क्रमांक मुक्ता भूषण जोशी (स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस), तृतीय क्रमांक स्वरदा शाम साठे (माध्यमिक विद्यालय वरवडे),
गट सहावा अकरावी बारावी विषय होता भगवदगिता १२वा अध्याय सहभागी झालेले विद्यार्थी होते ५ ,या मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तो वीणा योगेश काळे (आर. बी .कुळकर्णी .जूनि .कॉलेज रत्नागिरी) द्वितीय क्रमांक अदिती उदय काजरेकर (आर .बी .कुळकर्णी. जूनि .कॉलेज रत्नागिरी), तृतीय क्रमांक श्रिया अभिजित केळकर (आर.बी.कुळकर्णी.जुनि .कॉलेज रत्नागिरी) या सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रुपये व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर पाठांतर स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून रविंद्र पाटणकर, वासुदेव केळकर, प्रथमेश गोडबोले, मिलिंद सुर्वे, बाबासो बेडक्याळे, महेश राडे, राहुल यादव, स्नेहल माने यांनी उत्तम काम पाहिले. सर्व सहभागी विद्यार्थी तसेच शिक्षक पालक यांना देवस्थान च्या वतीने अल्पोपहार, चहा व दुपारी पुलाव व शिरा देण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळे व भक्तनिवास मधील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.