(रत्नागिरी)
जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी रविवारी पाली येथील तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यास उपस्थिती लावली. तक्षशिला पतसंस्थेने २५ व्या वर्षात पदार्पण केले, या निमित्ताने तक्षशिला स्मरणिका २०२४ पुस्तिकेच अनावरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी या पतसंस्थेला शुभेच्छा देत कौतुक केले ते म्हणाले, पतसंस्थेचा आजपर्यंतचा कारभार पारदर्शकपणा आहे तसाच भविष्यात राहिला तर इतर सहकार पतसंस्थेच्या पुढे ही संस्था जाईल असे संबोधित केले. रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात या पतसंस्थेची जिल्हा शाखा बनवण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आले. ग्रामीण भागातील पतसंस्था ज्या पद्धतीने काम करते या पतसंस्थेचा आदर्श इतर पतसंस्थेने घेऊन आपली वाटचाल करावी असे आव्हान यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, पाली गावचे सरपंच विठ्ठलशेठ सावंत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामभाऊ गराटे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मधुकर टिळेकर, पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद हितचिंतक आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.