(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील परभणी घटनेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा तालुका शाखा रत्नागिरी पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. या घटनेचां निषेध व्यक्त करून दिनांक १६ डिसेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.
या सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान शिल्पाची मोडतोड एका माथेफिरू व्यक्तीने केलेली असून त्यामुळे अखंड भारत वासियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी आंदोलन करीत असताना अटक केलेल्या भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत असताना संशयास्पद मृत्यू झालेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा तालुका शाखा रत्नागिरी यांचे वतीने या घटनांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत.
यापुढे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे जाती जाती मध्ये वाद निर्माण करून, एका भीमसैनिकांचा जीव घेऊन राज्यामधील सामाजिक वातावरण कलुशीत करण्याचा हा प्रकार आहे ही गोष्ट राज्याच्या दृष्टीने लांच्छनास्पद आहे आणि हे आपल्या राज्याच्या हिताचे नाही. माथेफिरूवर तसेच पोलीस प्रशासनातील दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करून महाराष्ट्राचे पुरोगामीत्व आबाधित ठेवावे अशी तमाम आंबेडकरी समाजाची मागणी आहे. परभणी घटनेची तात्काळ गंभीर दखल घेऊन आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी देखील आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.