(देवरूख / सुरेश सप्रे)
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व बीड तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने जुनियर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा दि. 25 जुलै ते 27 जुलै बीड या ठिकाणी संपन्न होत असून या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडू सहभागी होणार आहेत.
संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब व लायन्स तायक्वांडो क्लब हे सर्व खेळाडू क्युरोगी मध्ये तनुश्री नारकर,तनिष खांबे,गंधर्व शेट्ये,ओम घाग हे खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहामध्ये या ठिकाणी नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, उपाध्यक्षा सौ.ॲ.पूनम चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, स्वाती नारकर, रुपाली कदम,सौरभ वनकर. प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, गायत्री शिंदे, सुमित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या निवड झालेल्या खेळाडूंना तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आम. डॉ. सुभाष बने, आमदार शेखर निकम, रोहन बने, माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, प्रफुल्ल भुवड, चिन्मय साने, क्लब सदस्या अनुजा नार्वेकर, सिद्धी केदारी.आदींनी शुभेच्छा दिल्या.