(तरवळ / अमित जाधव)
तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईच्या अंतर्गत रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीनं जागतिक ब्लॅक बेल्ट परीक्षा दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल रत्नागिरी या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
जिल्हा संघटना अध्यक्ष राज्य संघटना खजिनदार वेंकटेश्वरराव कर्रा, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण के, कोषाध्यक्ष शशांक घडशी,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. ही तायक्वांडो ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी 7th दान ब्लॅक बेल्ट सुभाष पाटील सर व 5th दान ब्लॅक बेल्ट लक्ष्मण के हे परीक्षक म्हणून काम पाहिले या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले होते या परीक्षेसाठी तायक्वांडो मार्शल आर्ट स्पोर्ट्स सेंटर मालगुंड चे खेळाडू यूविका किशोर गुरव, चिन्मयी सूर्यकांत गोनबरे, स्वरीत संदीप डांगे, वेदांत दीपक बापट या खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत जागतिक तायक्वांडो ब्लॅक बेल्ट पटकावला. या खेळाडूंना प्रशिक्षक रुपेश तावडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल क्लबचे रोहित मयेकर किशोर गुरव राज देवरुखकर, सूरज पवार जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश कर्रा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे कोषाध्यक्ष शशांक घडशी राम कररा, लक्ष्मण कररा, मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष बंधू मयेकर, सचिव विनायक राऊत यांनी अभिनंदन केले आहे.