(मुंबई)
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून २०२० रोजी या जगाचा निरोप घेतला. अभिनेत्याच्या मृत्यूला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु चाहते अजूनही त्यांची आठवण काढतात. अभिनेत्याची बहीण श्वेता सिंग कीर्ती आपल्या अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असते. श्वेताने अलीकडेच एका पॉडकास्टदरम्यान तिचे काही स्पिरिच्युअल अनुभव शेअर करताना तिने सांगितले की ती ध्यान करते आणि धार्मिक स्थळांना भेट देत असते. तसेच आपला दिवंगत भाऊ सुशांत याच्याबद्दल खुलासा करताना ती म्हणाली, की सुशांतही महादेवाचा मोठा भक्त होता. श्वेताने तिचे आध्यात्मिक अनुभव शेअर करताना सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की आजही तिला सुशांत आपल्या अवतीभवती जाणवतो.
पॉडकास्टमध्ये ध्यानाविषयी बोलताना श्वेता म्हणाली की, जर कोणी आपल्याला सोडून गेले तर आपल्याला त्यांची खूप आठवण येते आणि अशा परिस्थितीत आपण ध्यान केले तर ते आपल्या स्वप्नात येतात. याबद्दल बोलताना श्वेताने सुशांतशी संबंधित एक किस्सा शेअर केला. ती म्हणाली की, तिला आजही सुशांत तिच्या अवतीभवती असल्यासारखा वाटतो. श्वेताने सांगितले की, सुशांतच्या मृत्यूनंतर सुमारे दीड वर्षांनी असे काहीतरी घडले ज्यामुळे आम्हाला भाऊ आमच्यासोबत आहे असे वाटू लागले.
ही घटना शेअर करताना श्वेता म्हणाली की, एकदा मी माझे AirPods कुठेतरी विसरले होते आणि मी ते सर्वत्र शोधले, पण मला ते सापडले नाहीत. मी काळजीत पडले, मग मला जाणवले की, माझ्या कानात भाऊ (सुशांत सिंह) काहीतरी कुजबुजत आहे. मला त्याचा आवाज जाणवला, त्याने म्हटले,जा आणि खिडकीच्या पडद्यामागे बघ, तिथे तुझे एअरपॉड्स ठेवलेले आहेत आणि जेव्हा मी तिथे पाहिले तेव्हा मला माझे एअरपॉड्स सापडले, मग अचानक मी घाबरले आणि मी विचारले की भाऊ हे काहीतरी भयानक आहे का ? मी तुला ऐकू शकते, तुला अनुभवू शकतो, तेव्हा भाऊ म्हणाला नाही, मी तिथे शारीरिकरित्या उपस्थित नाही, परंतु मी तुमच्याशी असेच कनेक्ट राहू शकतो आणि बोलू शकतो असा अनुभव सुशांतच्या बहिणीने सांगितला.
श्वेताने पुढे सांगितले की, या घटनेनंतर ती अनेकदा आपल्या भावाला फील करू लागली. ती म्हणाली की, सुशांत अनेकदा अशा गोष्टी करू लागला, जेव्हा मी गाडीतून कुठेतरी जाते तेव्हा अचानक त्याची गाणी वाजायला लागतात किंवा जेव्हा मी आरती आणि भजन करते तेव्हा अचानक त्याच्या ‘केदारनाथ’ चित्रपटातील शिवजींचे गाणे टीव्हीवर वाजू लागते. एकदा असे झाले की मी माझ्या परीक्षेसाठी खूप तणावाखाली होते आणि खूप पुस्तके वाचू लागले. त्या काळात मी स्वत:ला शांत ठेवण्यासाठी खूप मिडिटेशन करत होते, तेव्हाही मला जाणवले की भाऊ येऊन मला म्हणाला, की एवढा ताण डोक्यावर नको घेऊस आणि तणावात नको राहूस असा खुलासा श्वेताने यावेळी केला.
हे सर्व शेअर करताना श्वेता म्हणाली की,अशा अनेक गोष्टी आहेत. आजपर्यंत सुशांत आणि मी एकमेकांशी जोडलेले आहोत. आमचे बालपणही असेच गेले. आमचे नाते खूप चांगले होते. आम्ही एकमेकांसोबत खूप मजा करायचो.जर सुशांतला तुम्हाला सांगायचे असेल कि तो तुमच्या आजूबाजूला उपस्थित आहे, तर तो काहीतरी अशी हालचाल करेल जे तुम्हाला जाणवेल. |
श्वेताने असेही सांगितले की जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा मला वाटले की माझ्या भावाचा आत्मा वर्षभर अस्वस्थ आहे, परंतु मिडिटेशन करताना मला स्वप्नात दिसले की आता माझा भाऊ कैलासमध्ये भगवान शिवसोबत आहे आणि आनंदी आहे. व ते आपल्या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत.