(गुहागर)
राहत्या भाड्याच्या खोलीत पंख्याच्या हुकला टॉवेलच्या सहाय्याने ३१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान गुहागर तालुक्यातील वरचा बाग येथे उघडकीला आली. जितेश विलास मुरटे (सध्या रा. गुहागर बाग, मूळ रा. चांदिवली अंधेरी, मुंबई) असे त्याचे नाव आहे. जितेश गुहागरातील मुरटे हा एलएनजी कंपनीत कामाला होता. तोच गुहागरातील वरचा बाग परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. सोमवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास कंपनीतील काही सहकारी त्याला मोबाइलवर फोन करत होते. मात्र, तो कॉलला प्रतिसाद देत नसल्याने हे सहकारी त्याच्या खोलीवर गेले. त्यावेळी खोलीला आतून कडी होती. त्यांना संयश आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता जितेश पंख्याच्या हुकला टॉवेलच्या साहायाने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला.
याबाबत गुहागर पोलिसांना माहिती देताच अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी गुहागर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
त्रास देणाऱ्यांची नावे चिठ्ठीत
जितेश मुरटे मुरटे हा है गुहागरातील एलएनजी कंपनीत कामाला होता. त्याच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून, त्यात आत्महत्येमागील कारणांचा उल्लेख आहे. त्यात त्रास देणाऱ्या काहींची नावे त्याने लिहिली आहेत. त्यानुसार आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.