(रत्नागिरी)
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे युवा महोत्सव साजरा करण्यात येतो. 57 व्या युवा महोत्सवाच्या तयारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 33 महाविद्यालये सहभागी झाली होती. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेसाठी कोणते नियम आहे. कोणत्या अटी आहेत त्याचबरोबर कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे याच्यासाठी मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे आणि त्यांच्या टीमने मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिक करून दाखवले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी 11 झोन मध्ये स्पर्धा होतात त्या स्पर्धा झाल्यानंतर विद्यापीठ अंतिम फेरीमध्ये स्पर्धा होतात.
स्पर्धांच्या नियोजनानंतर मुंबई विद्यापीठाचा संघ निवड करण्यासाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना निमंत्रित केले जाते त्यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवर इंद्रधनुष्य… सहा राज्यांच्या पातळीवर झोनल स्पर्धा आणि राष्ट्रीय स्तरावरती स्पर्धा होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मुंबई विद्यापीठ प्रतिनिधित्व करत असते. गेली अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर सतत चमकदार कामगिरी करणारा संघ म्हणून मुंबई विद्यापीठाकडे पाहिले जाते. या विद्यापीठाचा सभासद होण्यासाठी जिल्हास्तरापासून तयारी केली जाते.
रत्नागिरी जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. आनंद आंबेकर जबाबदारी सांभाळतात त्याचबरोबर डॉ. राजेश रासम, प्रा . संयोगिता सासणे यांच्याकडे सुद्धा जबाबदारी आहे गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी चे प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर यांनी नव्याने सुरू होत असलेल्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट पदवी बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि कोकणाच्या विकासासाठी कलाविकास किती महत्त्वाचे आहे हे समजून सांगितले.
या नवीन पदवीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे श्री निलेश सावे यांनी आश्वासन दिले विद्यार्थ्यांतील मधील उत्साह आणि शिस्तबद्ध स्पर्धा होण्यासाठी या सांस्कृतिक कार्यशाळेचे नियोजन केले होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयचे प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.