(जाकादेवी / वार्ताहर)
मुंबई विद्यापीठा अंतर्गत कार्यरत आजिवन अध्ययन विस्तार विभागामार्फत उडण महोत्सव दरवर्षी उत्साहात राबवण्यात येतो. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये नवनिर्माण कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लोवले संगमेश्वर येथे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक बळीराम गायकवाड व आजिवन अध्ययन विस्तार विभाग कमिटीचे कार्याध्यक्ष मा. कुणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उडाण महोत्सव आयोजित करण्यात आला. ‘उडाण महोत्सव 2024-25’ मधे मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफेकडून विस्तार विभागाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
उडाण महोत्सव मधील पथनाट्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विद्यार्थ्यांच्या संघाने मिळविले. या संघामध्ये कु. दिव्या सुर्वे, कु. स्वस्तिक मायगंडे,कु. चेतन नरळकर, कु. देवकी बैकर, कु. निशा शितप, कु. सुयोग आग्रे, कु. अथर्व बलेकर, कु. रुची वीर, कु. निलम निंबरे कु. अभिषेक मांयगडे यांचा समावेश होता. याशिवाय पोवाडा स्पर्धेमध्ये कु. आकाश धनावडे व पोस्टर स्पर्धेमध्ये कु. श्रेया पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यासाठी विस्तार विभागाचे प्रमुख सहा. प्रा तेजश्री रेवाळे व सहा. प्रा. हरेश गावडे तसेच माजी विद्यार्थी कु. नंदकुमार रसाळ व कु. सुशिल नरळकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रोहित मयेकर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका मयेकर, संस्थेचे संचालक सुरेंद्र माचिवले व महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये यांच्याकडून विद्यार्थ्यांचे प्रोत्साहानात्मक कौतुक करण्यात आले.