(मुंबई)
कोकण रेल्वे रोहा ते ठोकूर अशी ७४० किमी लांबीची आहे. रोहा ते वीर ४६.८ किमीचा या मार्गाचे ऑगस्ट २०२१ रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. मात्र, त्यानंतर या कामाबाबत हालचाल झाली नाही. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. कोकण रेल्वेनं जायचं म्हंटलं की प्रवाशांचे मोठेच होत होते. मात्र, आता कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग आला असून त्याचा प्राथमिक अहवालही रेल्वे बोर्डाला दिलाय. तो मंजूर झाला की या कामाला वेग येणार असून त्यामुळं जादा गाड्या सोडता येतील, गाड्यांचा वेग वाढेल.
रेल्वेचे सपाट अशा जमिनीवर प्रतिकिमी दुहेरीकरण करण्यासाठी २० कोटी खर्च अपेक्षित आहे. शिवाय घाट, बोगदा या ठिकाणी प्रतिकिमी १०० कोटी खर्च येतो. रोहा ते वीर असे दुहेरीकरण करताना ५३० कोटी रुपये खर्च आला. आता मडगाव ते ठोकूर व कणकवली ते सावंतवाडी असे टप्पा दुहेरीकरण करण्यात येईल. कोकणात जाणाऱ्या गाड्या विलंबाने धावतात. ब्लॉक काळात तर रेल्वेगाड्या खूप विलंबाने धावत होत्या. त्यामुळे रेल्वेगाड्या वेळेवर चालाव्यात याकरिता दुहेरीकरणाचे काम केले जात आहे, असेही संतोष कुमार झा यांनी सांगितले.
गाड्यांच्या पासिंगसाठी ठराविक ठिकाणी असलेला ट्रॅक सोडला तर 740 किलोमीटरचं अंतर फक्त एका ट्रॅकवर सुरु आहे. रोज 75 हून अधिक मालगाड्यांची ये जा या एकाच ट्रॅकवर सुरु असते. परिणामी प्रवासात निष्कारण जादा वेळ जातो. पण आता ही गैरसोय दूर होणार आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडं सुपूर्द केला आहे.
सपाट जमिनीवर रेल्वेच्या प्रतिकिमी दुहेरीकरणासाठी साधारणपणे 15 ते 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर,घाट,बोगद्याच्या ठिकाणी प्रति किमी खर्च 80 ते 100 कोटी रुपये अपेक्षित आहे. रोहा ते वीर दरम्यानचं दुहेरीकरण पूर्ण झालं असून त्यासाठी 530 कोटी रुपये खर्च आला. आता मडगाव ते ठोकुर आणि कणकवली ते सावंतवाडी दरम्यान टप्पा दुहेरीकरण केले जाईल.सध्या कोकण रेल्वेवरून दरदिवशी 55 रेल्वेगाड्या आणि 18 मालगाड्या धावतात. टप्प्या दुहेरीकरण झाल्यास, रेल्वेगाड्या धावण्याची क्षमता दुप्पट होईल.