(खेड)
तालुक्यातील शिरवली शाळा सुटल्यावर कोसळली आहे. मुसळधार पावसामुळे शाळेची इमारत कोसळल्याने स्थानिक पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी ‘जोपर्यंत शाळा दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी शाळेत येणार नाहीत,’ असा पवित्रा घेतला आहे.
पावसामुळे शाळा कोसळल्याने स्थानिक गावकऱ्यांनी खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधितांकडे गेल्यानंतर अधिकारी वर्गाने गावकऱ्यांकडे पाठ फिरवली होती. ग्रामस्थांना त्यांचे निवेदन कार्यालयात द्या, असे सांगून पालक, शाळा व्यवस्थापन समितीची भेट टाळली. यामुळे मंगळवार पासून स्थानिक पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी थेट शाळा बंद आंदोलन सुरु केले आहे.
यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शाळेत नेमणूक असलेले शिक्षक शाळेत येऊन हजेरी लावत आहेत. तर, शाळेतील विद्यार्थी शाळेत हजरच नाहीत, अशी अवस्था शिरवली शाळा नंबर १ ची झालेली आहे. विद्यार्थी शाळेकडे फिरकतही नसल्याने शिक्षण विभाग नेमकी कोणती भुमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. बसण्याची व सामान ठेवण्याची व्यवस्था केली आहे.