( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत कला महाविद्यालयालयीन स्तरावर मूलभूत अभ्यासक्रम या विभागातील कु. शुभम जाधव -प्रथम, कु.मैत्रेय आयरे -द्वितीय, कुमारी. उर्वी पटेल -तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार मा. प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के ,सर्व स्कुल कमिटी सदस्य, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे .