(चिपळूण)
तालुक्यातील असूर्डे गावच्या रहिवाशी उत्तमा देऊ पवार यांचे गेल्यावर्षी ३० जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचा प्रथम स्मृतिदिन पवार परिवाराने विविध उपक्रमांनी साजरा केला.
उत्तमा पवार या कोकण रेल्वे कर्मचारी योगेश पवार यांच्या मातोश्री होत. योगेश पवार व परिवाराने आईच्या प्रथम स्मृतिदिनी फक्त धार्मिक विधी न करता आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून धार्मिक विधीबरोबर विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी धार्मिक विधी पार पडल्यावर संध्याकाळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात कडवई येथे व्यायामशाळा चालविणाऱ्या मिलिंद कडवईकर यांच्या व्यायामशाळेला आर्थिक मदत देण्यात आली व त्यांचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला अभा अंनिसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर, निवृत्त बँक मॅनेजर शांताराम भुरवणे, सामजिक कार्यकर्ते विलास डिके, प्रा.संदीप येलये, बीएमसी निवृत्त अधिकारी संजय जाधव, उपसरपंच दिलीप जाधव व शिक्षिका कवितके व मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नातेवाईक व विद्यार्थी उपस्थित होते.