( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
तालुक्यातील वांद्री येथील प्राथमिक शाळेत घडलेल्या शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेतील आरोपी संजय मुळ्ये याला कठोर शासन व्हावे यासाठी संगमेश्वर तालुका काँग्रेसच्या वतीने संगमेश्वर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल वर्षाराणी कोष्टी यांना निवेदन देण्यात आले.
पोलीस स्टेशनला निवेदन देण्याआधी तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वांद्री शाळेत जाऊन सदर विद्यार्थिनींची आणि पालकांची भेट घेतली व त्यांना मानसिक आधार दिला.ग्रामस्थांशी चर्चा करताना त्यांनी सबंधित घटनेतील मुलींना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व जेणे करून समाजातील अशा विकृतींना आळा बसला पाहिजे या संदर्भात रत्नागिरी पोलीस निरीक्षक धनंजय कुलकर्णी व पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली. अशा घटना घडू नयेत यासाठी मुली व महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने ठोस पावले उचलावी अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.ग्रामस्थांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे.या विद्यार्थ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहील असे वचन उपस्थितांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष दत्ता परकार,मिताली कडवईकर तालुकाध्यक्ष (महिला),आसिफ काझी तालुकाध्यक्ष (अल्पसंख्यांक),संदीप वेल्हाळ तालुका सचिव,काशिनाथ वाझे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष,अनिल भुवड देवरूख शहराध्यक्ष,प्रकाश जाधव,अभिजित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.