(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी, २० जुलै रोजी दुपारी ३:३० वाजता एसटी बसची दुचाकीला धडक बसून अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीस्वारसह दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी एसटीचालकावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र पंढरीनाथ शिरसाठ (रा. माणूर, कळवण, नाशिक), असे गुन्हा दाखल झालेल्या एसटीचालकाचे नाव आहे. या अपघातात दुचाकीस्वार जयंत काशिनाथ मेटकर (२४, परशुराम पायरवाडी), हर्ष परशुराम मेटकर (१७, परशुराम देऊळवाडी) जखमी झाले आहेत. जयंत मेटकर दुचाकी घेऊन जात असताना एसटी बसचालकाने अचानक उजव्या बाजूला गाडी घेऊन दुचाकीला धडक दिली. यामध्ये जयंत मेटकर व हर्ष मेटकर जखमी झाले. एसटीचालक शिरसाठ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अधिनियम २०२३चे कलम २८१, १२५ (अ) (ब) व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.