(गणपतीपुळे / वैभव पवार)
छत्रपती संभाजी महाराज्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ( रजि.) आणि नंदादिप आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने देवरुख डेपो येथे एस.टी कर्मचारी यांच्याकरीता मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संस्थापक / अध्यक्ष श्री.सुनिल धावडे यांनी सांगितले, आपल्याकडे अनेक सामाजिक संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी कामे करत असतात. परतूं तांत्रिकदृष्ट्या प्रगत पायाभूत सुविधा आणि सेवा सातत्याने देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. छावा प्रतिष्ठान रत्नागिरी च्या माध्यमातून आरोग्य सेवा, शिक्षण, गड संवर्धन, क्रिडा, अशा विविध क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये प्रतिष्ठान च्या माध्यमातून देवरुख एस.टी कर्मचारी यांना प्राथमिक सेवा देण्यावर व त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कायम सेवेचे ठायी तत्पर असेल असे सांगितले. याचाच एक भाग म्हणून २०१४ साली छावा प्रतिष्ठान रत्नागिरी कडून अशा सामाजिक उपक्रमाची सुरुवात झाली.
दरवर्षी रत्नागिरी जिल्हातील एस.टी कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या नेत्र तपासणी शिबिरामध्ये देवरुख येथील ११२ एस.टी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे देवरुख येथे एस.टी कर्मचारी यांच्यातकरीता आरोग्य सेवा मिळविण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमाला आगार व्यवस्थापक – सौ. मधाळे मॅडम, विशेष सहकार्य – समीर शिंदे कर्मचारी, नंदादीप आय केअर हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर, कर्मचारी आणि छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे सचिव समीर गोताड, संघटक समीर धावडे, खजिनदार संगम धावडे, सदस्य नितिन रोडे, प्रतिक्षा शिगवण, सायली पारधी, पूजा पोतदार इ. मान्यवर उपस्थित होते.