(रत्नागिरी)
गणेशोत्सवात धावणाऱ्या जादा गणपती स्पेशल एसटी फेऱ्यांचे आरक्षण प्रशासनाने ४ जुलैपासून खुले केले आहे. या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने कोकण मार्गावर ४ सप्टेंबरपासून १५ जादा बसेस धावणार असल्याचे महामंडळाने जाहीर केले.
यावर्षी गणेशोत्सवाची धामधूम ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कोकणात येणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने जादा एसटी बसफेऱ्यांकडे नजरा होत्या. अखेर एसटी प्रशासनाने १५ जादा बसफेऱ्या जाहीर केल्याने आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी प्रवाशांची त्या-त्या बसस्थानकातील तिकीट खिडक्यांवर गर्दी होऊ लागली आहे.
कोकणात ४ सप्टेंबरपासून सायंकाळी ६ वाजता कल्याण कणकवली, ६:३० वाजता कल्याण – राजापूर, रात्री १० वाजता कल्याण – चिपळूण, ९ वाजता कल्याण गुहागर. कल्याण दापोली, सायंकाळी ७ वाजता विठ्ठलवाडी राजापूर, रात्री ८:४५ वाजता विठ्ठलवाडी – रत्नागिरी, सायंकाळी ७:१५ वाजता विठ्ठलवाडी- जैतापूर, रात्री ८:३० वाजता विठ्ठलवाडी- साखरपा, ८:१५ वाजता विठ्ठलवाडी- देवरूख, सायंकाळी ७ वाजता विठ्ठलवाडी गुहागर, रात्री ८:४५ वाजता विठ्ठलवाडी चिपळूण, ८:१५ वाजता विठ्ठलवाडी दापोली, रात्री ९:४५ वाजता विठ्ठलवाडी- खेड, सकाळी ११:३० वाजता विठ्ठलवाडी- शिवतरघळ जादा बसफेऱ्या जाहीर केल्या आहेत.