(करिअर)
SSC CHSL अंतर्गत लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जानेवारी २०२३ आहे.
SSC CHSL (१०+२) परीक्षेत लोअर डिव्हिजन कर्ल्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहायक आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांचा समावेश आहे. यामध्ये संगणक-आधारिक चाचणी, वर्णनात्मक पेपर आणि कौशल्य चाचणी किंवा टायपिंग चाचणीद्वारे लिपिक पदांची निवड करण्यात येणार आहे.
पदांचा तपशील
कनिष्ठ विभाग लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A
पदसंख्या – ४ हजार ५०० जागा
पदाचे नाव – लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – १८ ते २७ वर्ष
अर्ज शुल्क – १०० रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – ६ डिसेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जानेवारी २०२२
अधिकृत वेबसाईट – http://ssc.nic.in
वेतनश्रेणी –
लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – १९ हजार ९०० रुपये ते ६३ हजार २००
डेटा एंट्री ऑपरेटर – २५ हजार ५०० ते ९२ हजार ३००
डेटा एंट्री ऑपरेटर grade ‘A’ – २५ हजार ५०० ते ८१ हजार १००