(फुणगूस / एजाज पटेल)
प्रथा व परंपरेनुसार कोकणातील शिमगोत्सव हा पारंपरीक सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केले जात आहे. संगमेश्वर मध्ये निनावी देवी चा होळीकोत्सव आनंद, उत्साह व तेवढ्याच जल्लोषात ढोल ताशे तसेच पिपाणीच्या गजरात तल्लीन होऊन व तालासुरावर नाचून बालबालकांसह तरुण तरुणाई आपल्या मानकरांसमवेत माड हातावर झेलवत-झेलवत दोन्ही निनावी देवींच्या माडांची अनोखी भेट मुबंई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील संगमेश्वर एसटी बस स्थानकसमोरील महामार्गांवर झाली. यामध्ये गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
निनावी देवींच्या दोन माडांची वीलोभनीय अचानक झालेली भेट पाहण्यासाठी महामार्गवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. डोळ्याचे पारणे फेडणारे दृष्य पाहून अनेकांना आपल्या भ्रमणध्वनी कॅमेऱ्यात फोटो तसेच विडिओ काढण्याचा मोह आवरता आले नाही. तसेच महामार्गवरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनातील प्रवाशांनीही आपली वाहने थांबून अनोख्या भेटीचे आंनद लुटत असतानाच मोबाईल कॅमेऱ्यात फोटो व्हिडिओ कैद करण्यासही विसरले नाही.
हुरा रे हूरा… आमच्या निनावी देवीचा… सोन्याचा तुरा रे…. होलीयो अशा जयघोषातनिघालेल्या दोन्ही माडांच्या अनोख्या भेटी दरम्यान महामार्गांवर उसळलेली गर्दी आणि वाहनांची वर्दळ सुरळीत ठेवण्यासाठी संगमेश्वर पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस हेड कॉन्सटेबल सचिन कारमेकर, पो. कॉ. आव्हाड यांनी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या मार्गदर्शखाली विशेष मेहनत घेतली. येथे अतिशय भक्तीमय वातावरणात होलीकोत्सव संपन्न होत आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1