(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेची सभा रविवार दि .०६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त सरचिटणीस तथा कास्ट्राईब कर्मचारी महासंघ रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शिरीष भालशंकर यांचे अध्यक्षतेखाली स्वप्नपूर्ती हॉटेल खंडाळा, जयगड रोड, येथे आयोजित करण्यात आली आहे. या तालुका सभेसाठी जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य तसेच संगमेश्वर, लांजा, राजापूर येथील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, सभासद उपस्थित राहणार आहेत. तरी रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सभासदांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे तालुकाध्यक्ष आयु. एस्. के जाधव (वरवडे हायस्कूल) यांनी केले आहे.
या विशेष सभेमध्ये उपस्थितांचे स्वागत व सत्कार, सभा प्रास्ताविक संघटनेची गरज व महत्व, तालुका पदाधिकारी मनोगते, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पदोन्नती, वरिष्ठ व निवड श्रेणी, समावेशन तसेच अतिरिक्त व रिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समायोजन चर्चा,आयत्या वेळच्या विषयावर चर्चा, अध्यक्षीय मनोगत व आभार अशा स्वरूपात होणार आहे. या सभेचे आयोजन रत्नागिरी तालुका कास्ट्राईब शिक्षक व शिक्षकेतर संघटना पदाधिकारी व सदस्य, सभासद यांनी केले आहे.