(रत्नागिरी)
“२०१४ पूर्वी होणारे बॉम्बस्फोट, आतंकवादी संघटनांकडून होणाऱ्या समाजविघातक घटना रोखण्याचे काम करण्याची हिंमत आमच्यात आहे. आम्ही वेळोवेळी ते सिद्ध केले आहे, त्यामुळे देशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली आहे. हीच तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचे नैतिक दायित्व पार पाडणाऱ्या मोदी सरकारला आणि मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेलाच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याचा अधिकार आहे.” असे भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. विनोद तावडे यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले.
ते पुढे म्हणाले, “मतदान सहानुभूतीवर होत नाही. मतदान होते ते राष्ट्रनिर्माण आणि विकासाच्या प्रवाहात योगदान देण्याच्या क्षमतेवर. विरोधी बाकावर बसणाऱ्या कोण्याही नेत्यामध्ये अशी क्षमता नाही हे सर्वश्रुत आहे. त्यातही विरोधी बाकावर बसण्यासाठी एखाद्या नेत्याला निवडून देण्यापेक्षा सत्तेचा लाभ जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी दादासाहेब राणे यांच्यासारख्या कार्यक्षम नेत्याला जनता निवडून देईल हा आम्हाला विश्वास आहे.”
“देशभर चाललेल्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्री कार्यक्रमावर आधारित आत्तापर्यंत झालेल्या कामावर जनता समाधानी आहे आणि जनतेलाही माहीत आहे ‘आयेगा तो मोदीही’. पण असे म्हणून चालणार नाही. मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडून दादासाहेबांना म्हणजेच मोदीजींना समर्थन द्या. त्यानंतर तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न आणि तुमच्या गरजांचा भार पेलण्यास मोदी सरकार ३.० तत्पर योगदान देईल याची मी ग्वाही देतो.” असा विश्वास त्यांनी यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांना देत ७ मे रोजी मतदानहोईपर्यंत सजग राहण्याचा सल्ला दिला.
यावेळी मंचावर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-रिपाई-मनसे व अन्य मित्रपक्षांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणातून राणे साहेबांच्या माध्यमातून मोदीजींना कोकणचा शिलेदार देण्याचा संकल्प उद्धृत केला.