(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुंड च्या मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य वरीष्ठ महाविद्यालय चाफे या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा सुभाष पालये यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी माजी केंद्रीय मंत्री कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्यातर्फे धर्मनाथ भवन बेळगांव कर्नाटक या ठिकाणी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार हा इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी ची.बेळगावी आणि नॅशनल रुरल डेव्हलपेंट फाऊंडेशन( रजि) बेळगावी हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगावी (दिल्ही गुजरात कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा) या राष्ट्रीयकृत संस्थेमार्फत शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. चाफे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा सुभाष पालये यांना हा यावर्षीचा बहुमान मिळाला आहे. प्राचार्या स्नेहा पालये या चाफे महाविद्यालयात गेली अनेक वर्षे अध्यापनाबरोबर कॉलेज व्यवस्थापनाचे काम चांगल्या प्रकारे करीत आहेत, अतिशय हुशार आणि शिस्तप्रिय अशी त्यांची ओळख आहे.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा सुभाष पालये यांना हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर,कार्याध्यक्ष आणि सचिव रोहित मयेकर, उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, खजिनदार ऋषिकेश मयेकर, संचालक सुरेंद्र माचीवले तसेच मोहिनी मुरारी मयेकर वरीष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रभारी प्राचार्या स्नेहा सुभाष पालये यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारा बद्दल त्यांच्या वर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.