(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे जयभीमनगर येथील बौद्धजन पंचायत समिती गाव शाखेचे ज्येष्ठ सभासद सिताराम भागुराम चव्हाण यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. सैतवडे जयभिनगर येथील बौद्धजन पंचायत समितीच्या गावशाखेचे विद्यमान अध्यक्ष, बौद्धाचार्य तथा सैतवडे गावचे उपसरपंच आणि खंडाळा हायस्कूलचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री. सुवेश सिताराम चव्हाण यांचे ते वडील होत.
अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेल्या सिताराम चव्हाण यांनी आपल्या आयुष्यात समाजातील धार्मिक, सामाजिक कामकाजात मोठे योगदान दिले होते. सैतवडे जयभीमनगर येथील गाव शाखेसाठी ते एक मार्गदर्शक म्हणून काम करीत असत. त्यांचा धार्मिक, सामाजिक कामातील सक्रिय सहभाग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता समजताच शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर आणि त्यांचे विविध गावचे नातेवाईक आणि प्रतिष्ठित मंडळी सहभागी झाले होते. त्यांचा पुण्यानुमोदन तथा जलदान विधी कार्यक्रम गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी अश्विनी पौर्णिमेच्या पवित्र दिनी त्यांच्या निवासस्थानी सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या पुण्यानुमोदन आणि श्रद्धांजली सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन सैतवडे जयभीमनगर गावशाखेने केले आहे.