(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ११ कळझोंडी गावची सुकन्या कुमारी सृष्टी उत्तम पवार हिने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत ९२.६०% गुण प्राप्त केल्याने तिचा रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने रविवार दिनांक २८ जुलै रोजी खंडाळा बुद्ध विहार येथे विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सदर सत्कार हा आयुष्यमान प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी प्राध्यापक सुनील कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.
यावेळी तालुका कार्यकारी पदाधिकारी, शाखा पदाधिकारी, समस्त बंधू, भगिनी उपस्थित होणार आहे. कुमारी सृष्टी उत्तम पवार ही रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेत होती. तिने शालेय अध्यापनाबरोबरच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. तसेच शासकीय चित्रकला ग्रेट परीक्षा इलेमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेमध्ये अ ग्रेट प्राप्त केला आहे.
अतिशय जिद्द चिकाटीने तिने आपले शैक्षणिक शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात तिने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे. प्रशालेतील सर्व शिक्षकांचे व तिचे वडिल कलाशिक्षक उत्तम पवार, आई रचना उत्तम पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सृष्टी हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.