(नाणीज)
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील सुंदरगडावर बुधवारी श्रीराम नवमी उत्सव श्रीरामाचा जयजयकार करीत हर्षोल्हासात साजरा करण्यात आली. येथील श्रीराम मंदिरात पूजा, पाळण्यातील बाल श्रीराम, त्यांचे पूजन, पाळणा, आरती, श्रीरामाची गाणी अशा अनेकविध उपक्रमांनी हा सोहळा आनंददायी ठरला.
बुधवारी सकाळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज, प.पू. कानिफनाथ महाराज यांचे सुंदरगडावर सहकुटुंब आगमन झाले. त्यानंतर सर्वजण राममंदिराकडे निघाले. सोहळ्यासाठी श्रीराम मंदिर व मंदिरातील श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान यांच्या मूर्तीही सजवण्यात आल्या आहेत.
सुरुवातीला प.पू. कानिफनाथ महाराज व सौ. ओमेश्वरीताई यांनी श्रीराम मंदिरातील मूर्तींची विधिवत पूजा केली. मंदिरात आकर्षकरिता पाळणा बांधण्यात आला होता. तो तितकाच आकर्षकरित्या सजवला होता. त्यात बाळश्रीरामास ठेवण्यात आले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी बाळश्रीरामाचे पूजन केले, दर्शन केले. त्यानंतर जन्मकाळ सुरू झाला. सौ. सुप्रियाताई व सौ. ओमेश्वरीताई व सुवासिनींनी पाळणा जोजोवला. त्यानंतर आरती झाली. सर्व भाविकांनी यावेळी पुष्पवर्षाव केला. सर्वांना प्रसाद देण्यात आला. यावेळी श्रीरामांनी गाणी गाण्यात आली.
संपूर्ण सोहळा विधिवत सुरू होता. गेले दोन दिवस सुरू असलेल्या सोहळ्याचे पौरौहित्य वे.शा.सं. भालचंद्रशास्त्री शौचेगुरुजी व त्यांच्या सहकार्यांनी केले. शौचेगुरुजी सांगतील त्या पद्धतीेने सारा सोहळा पार पडला. सोहळ्यासाठी काल भाविक मोठ्या संख्येने राज्याच्या विविध भागातून सुंदरगडावर आले होते. सोहळ्यानंतर श्रीराम मंदिराबारोबरच संतशिरोमणी गजानन महाराज, वरद चिंतामणी मंदिरांत दर्शनासाठी गर्दी होती. रांगांनी भाविक दर्शन घेत होते. नाथांचे माहेर येथेही दिवसभर दर्शन घेण्यास गर्दी होती.
बुधवारी चरणदर्शन सोहळा झाला. सकाळी धर्मक्षेत्र मासिकाच्या प्रसारकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दुपारी चरणदर्शन सोहळा झाला. तसेच धर्मक्षेत्र उद्दीष्टपूर्ती केलेल्या जिल्ह्यांचा व पीठांचा सत्कार करण्यात आला. काल दिवसभर उन्हाचा जोरदार तडाखा होता. संस्थानने दोन्ही दिवस भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था केली होती. दुपारी भाविक सावलीत विश्रांती घेत होते.
भाविकांसाठी दोन दिवस २४ तास महाप्रसादाची व्यवस्था होती. त्यासाठी संस्थानने खास व्यवस्था केली होती. भाविक रांगेने तिथे महाप्रसाद घेत होते. रात्री-अपरात्री आलेल्या भाविकांना तातडीने प्रसाद दिला जात होता. गेले दोन दिवस सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिर सुरू होते. नामवंत तज्ज्ञ डॉक्टर्सनी येथे तपासणी व उपचार केले. त्याचा लाभ दोन दिवस भाविकांनी घेतला. आज सायंकाळी त्याची सांगता झाली.