(रत्नागिरी)
रत्नागिरीत आर एस एस चे संचलन होत असताना अनुचित प्रकार घडल्यावर उद्भवलेल्या प्रसंगाच्या वेळी पोलिसांकडून केलेल्या लाठीचार्जची सखोल चौकशी करावी यासाठी रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.
शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी कोकणनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन सुरू होते. या दरम्यान झालेल्या लाठीचार्ज ची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी यासाठी रत्नागिरी तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना आज निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, विभाग प्रमुख प्रकाश रसाळ, तारक मयेकर, नितीन लिमये आदी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.