(रत्नागिरी)
सोमवार दि १२/०८/२०२४ रोजी युवासेना कॉलेज कक्षाची बैठक संपन्न झाली. युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, युवासेना कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुख पारस साखरे, युवासेना कॉलेज कक्ष तालुकाप्रमुख अमन राणे, युवतीसेना तालुकाप्रमुख नुपूर आचरेकर, युवासेना कॉलेज कक्ष गुहागर तालुकाप्रमुख निहाल सुर्वे यांचा प्रमुख उपस्थितीमध्ये सदर बैठक झाली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत नियोजन करण्यात आले.