(रत्नागिरी / वैभव पवार)
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे रत्नागिरीतील नवनिर्वाचित तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी शिवसेना पक्ष आपण अधिक जोमाने वाढीवणार असल्याची ग्वाही शिवसैनिकांना दिली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या रत्नागिरी तालुकाप्रमुख पदी त्यांची नव्याने निवड झाल्या नंतर ते बोलत होते. या नव्या निवडीबद्दल उबाठा च्या शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्ष संघटना बांधणीसाठी आता जोमाने कामाला लागणार असल्याची भूमिका उबाठा च्या शिवसैनिकांनी घेतली आहे .
शेखर घोसाळे यांची रत्नागिरी शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदी नव्याने निवड झाल्याबद्दल उबाठाचे निष्ठावंत शिवसैनिक तथा माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, तसेच शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, विभाग प्रमुख विजय देसाई, युवासेना तालुकाध्यक्ष प्रसाद सावंत, माजी सभापती नगरपालिका नितीन तळेकर, तसेच पंचायत समिती सदस्य बाबू मयेकर, माजी बांधकाम सभापती नगरपरिषद रत्नागिरी सलील डाफळे आदींनी अभिनंदन केले आहे.