(रत्नागिरी)
शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक माजी नगराध्यक्ष कै. मधुकर कृष्णा घोसाळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ होते. त्यांनी तब्बल सहावेळा नगरसेवक पद भुषविले, तर रत्नागिरी शहराचे ते नगराध्यक्षही होते. त्यांच्या पश्चात ४ मुली, जावई, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने रत्नागिरी शहरात शोककळा पसरली आहे. आज सायंकाळी ६ वा. त्यांच्यावर आंबेशेत येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.