(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कडवईतील मंथन बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या व बचत गटाच्या सदस्या मिताली कडवईकर यांच्या घरी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिव प्रतिमेला सुंदर सजावट करण्यात आली होती.सजावटीमध्ये फुले, पाने व शिवरायांच्या जीवनावरील पुस्तकांची मांडणी करण्यात आली होती.
उपस्थित महिलांना शिवरायांवरील पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी मिताली कडवईकर यांनी शिवरायांच्या संघटन व व्यवस्थापन कौशल्यावर माहिती दिली. यानंतर उपस्थिताना चहापान झाल्यावर कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला बचत गट अध्यक्षा वैष्णवी रेडीज, सुप्रिया साळुंखे, राणी साळुंखे,श्वेता गोरीवले, सुनंदा कडवईकर आदी सहकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी मिताली कडवईकर यांच्या मुली मनश्री व मंजुश्री यांनी मेहनत घेतली.