( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
शहरानजीकच्या फणसोप येथील टाकळेवाडीतील शिमगोत्सव सोमवार दि. 17 रोजी होणार आहे. पालखीची सवाद्य मिरवणुकीने सोमवारी रात्री 12 वा. शिमगोत्सवाला प्रारंभ होईल.
सोमवारी सकाळी 11 वा. श्री देव लक्ष्मीकेशव पालखी फणसोप येथील मंदिरातून टाकळेवाडीतील घरे घेण्यासाठी प्रस्थान करणार आहे. वाडीतील ग्रामस्थांची घरे घेण्यानंतर पालखी दत्तमंदीर येथे भाविकांना दर्शनासाठी स्थानापन्न होणार आहे. रात्री 8 ते 10 यावेळेत महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम रात्री 10 ते 11 वा. होणार आहे. रात्री 12 वा. पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.
मिरवणूक झाल्यानंतर पिलणकर कुंटुबाच्या मुळ घरामध्ये पालखीची आरती, गार्हाणे होऊन पालखी फणसोप येथील देवळात जाण्यासाठी प्रस्थान करणार आहे. भाविकांनी पालखी मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन श्री देव लक्ष्मीकेशव उत्सव मंडळ टाकळेवाडीतर्फे करण्यात आले आहे. शिमगोत्सवानिमित्त महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात करण्यात आले आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव लक्ष्मीकेशव उत्सव मंडळाचे अध्यक्ष जगदीश साळवी यांनी केले आहे.