(चिपळूण)
शिव आरोग्य सेना रत्नागिरी जिल्हा सह समन्वयक श्री.शशिकांत मारुती चव्हाण यांच्या आरोग्य सेवेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय कोकण गौरव नुकताच पुरस्कार प्राप्त झाला. तसेच त्यांना आजतागायत 15 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत, त्याबद्दल व जनसेवेबद्दल शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने आज मुंबई येथे शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ.किशोर जी ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ.जयवंत गाडे, सरचिटणीस श्री जितेंद्र दगडू सकपाळ व राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या समवेत जाहीर सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.