(चिपळूण)
माध्यमिक शिक्षण विभाग,JSW फाउंडेशन आणि रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय PPT स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक,तंत्रस्नेही शिक्षिका कु.शर्मिला शिवराम म्हादे यांनी माध्यमिक विभागात “गणिताच्या आवडीतून स्पर्धा परीक्षा तयारी” या विषयावर सादर केलेल्या पीपीटीला जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार श्री. शेखरजी निकम, संस्थेचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब भुवड, संस्थेचे सेक्रेटरी श्री.महेश महाडिक, संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, उपमुख्याध्यापक श्री. विश्वास दाभोळकर, पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पाटील व आसावरी राजेशिर्के, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.