(रत्नागिरी)
गणेश विसर्जनानंतर चाकरमान्यांनी गुरुवारी रात्रीपासून परतीची वाट धरल्याने तालुक्यातील महत्वाच्या एस टी थांब्याना तसेच बसस्थानकात शुक्रवारी तुडुंब गर्दी झाल्याचे दिसून आले.
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी येथील आगाराने २५० जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले असून, गुरुवारी रात्रीपासूनच या बसेस सोडण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह अन्य ठिकाणांहून चाकरमानी मोठ्या संख्येने तालुक्यात दाखल झाले आहेत. गुरुवारी पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन होताच बहुसंख्य चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, विरार, नालासोपारा या ठिकाणी जाण्यासाठी चाकरमान्यांनी बसस्थानकामध्ये मोठी गर्दी केली आहे.