( लांजा )
तालुक्यातील मौजे कोंडगे वर्षावासाच्या निमित्ताने धम्ममित्र संतोष गमरे रत्नागिरी यांचे बौद्ध बनण्याची प्रक्रिया समजून घेताना…या विषयावर धम्म प्रवचन आयोजित करण्यात आले होते. हा वर्षावास कार्यक्रम रविवारी (दिनांक १५ सप्टेंबर २०२४ ) उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रवचनकार गमरे यांनी बौद्ध बनण्याच्या प्रक्रियेत एकूण 33 मुद्द्यांच्या आधारे बौद्ध बनण्याची प्रक्रिया सांगितल्या. यामध्ये अति महत्वाच्या दिवसांचे औचित्य साधून कार्यक्रम हाती घेणे. संकल्प करणे व प्रेरणा देण,कौटुबिक सुसंवादातून धार्मिक विचारांची अंमलबजावणी, शिका, संघर्ष करा, संघटीत व्हा, आत्मविश्वास बाळगा व कधीही धीर सोडू नका या पंचसूत्रीची जोपासना, तथागत भगवान गौतम बुध्दांनी सांगितलेली चार आर्यसत्य, दैनंदिन जीवनात त्रिरत्न ) व (बुध्द, धम्म व संघ बोधिसत्व डॉ. बाबासाहेबांच्या प्रती असीम श्रध्दा विकसीत करणे, कल्याण मित्रतेच्या निर्मितीतून एकसंघ निर्मिती, साप्ताहीक धम्मवर्गाचे आयोजन,धार्मिक शिबीरांचे आयोजन करणे अशा विविध मुद्द्यांवर धम्ममित्र संतोष गमरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत समजावून सांगितले.
हा वर्षावास कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाडीतील अनेकांनी मेहनत घेतली. यावेळी अध्यक्ष विश्वनाथ जाधव सचिव श्रीधर जाधव उपाध्यक्ष हरेश जाधव सल्लागार जे पी जाधव सल्लागार विधा जाधव महिला मंडळ अध्यक्ष प्रतिभा जाधव, धम्मचारी सत्यरत्न आदी उपस्थित होते.