(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा ओरी तसेच आदर्श महिला मंडळ ओरी या शाखेचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शाखेचे धडाडीचे माजी अध्यक्ष, जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य समितीचे ज्येष्ठ सल्लागार विष्णू देवराम जाधव (वय वर्षे ७५ ) यांचे दि.२५ रोजी हृदयविकराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
दिवंगत विष्णू जाधव यांनी ओरी ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणूनही अतिशय सक्रियपणे व उल्लेखनीय काम केले होते. अतिशय अभ्यासू,संयमी, मनमिळावू आणि विनोदी व्यक्तिमत्व म्हणूनही ते ओळखले जात. त्यांना सामाजिक व धार्मिक क्षेत्राची आवड होती. ते निर्व्यसनी होते. त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले.गावातील व वाडीतील विकास कामात त्यांचा मोठा हातभार होता.त्यांच्या जाण्याने स्थानिक व मुंबई कमिटीने शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली ,जावई , नातवंडे असा परिवार आहेत. त्यांचा पुण्यानुमोद जलदानविधी रविवार दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे.