(साखरपा /दीपक कांबळे)
मुंबई शहरापासून ते गाव भागापर्यंत निस्वार्थीपणे समाजासह राजकीय पक्षाच काम करणारा एक सच्चा व खंदा कार्यकर्ता महादेव खांदारे होय अशी प्रतिक्रिया लांजा पंचायत समितीचे माजी सदस्य लेखक सिद्धार्थ देवदेकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
लांजा पूर्व भागातील मौजे बोरीवली येथील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव शिवराम खंदारे यांचे दिनांक 6 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजासह राजकीय पक्षात फार मोठी पोकळी निर्माण झाले असल्याचे सिद्धार्थ देवदेकर यांनी म्हटले आहे.
ते पुढे असे म्हणाले की, महादेव खांदारे यांनी मुंबईपासून शिवसेनेच्या कामाला झोकून दिले होते. त्यानंतर भगवा सप्ताह सुरू झाल्यानंतर खांदारे यांनी गाव भागात आपले काम जोमाने सुरू केले. लांजा पूर्व भागातील बोरिवली येथील ते पहिलेच शाखाप्रमुख म्हणून कार्यरत झाले. त्यांच्या कामाची हातोटी आणि लोकांशी जुळलेले चांगले संबंध यामुळे त्यांना काम करण्याची चांगलीच ऊर्जा मिळाली होती अर्थातच निस्वार्थपणे कायम गाव भागातील कामाच्या अनेक समस्या घेऊन धडपडणाऱ्या या कार्यकर्त्याची दखल त्यावेळी चे आमदार विजयराव तथा अप्पा साळवी, गणपत कदम यांनी घेतली होती. त्यांच्यामुळे गावातील विविध विकासकामे मार्गी लागले आहेत.
राजकीय भूमिकेबरोबर धार्मिकतेचे त्यांना आवड होती. प्रतिवर्षी स्वखर्चाने दत्त जयंतीचा उत्सव घरी ते साजरा करत होते. संपर्कात असलेले अनेक कार्यकर्ते मित्रमंडळी त्यांच्या निवासस्थानी येऊन गेलेले आहेत. खांदारे यांचे सारखे सच्चे निस्वार्थी मनाचे कार्यकर्ते निघून गेले असल्याचे फार मोठे दुःख होत असल्याचे देवदेकर यांनी म्हटले आहे.