(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंचकमिटीच्या नव्या सरपंचपदी मालगुंड येथील डॉ. श्रीराम विश्वनाथ केळकर यांची निवड झाली आहे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे च्या पंचकमिटीने एकमताने ही निवड केली आहे. याबद्दल परिसरातून डॉ. केळकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. श्रीरामनवमीच्या पुण्यदिनी ही निवड करण्यात आली.
कै गोविंद केळकर, कै शंकर केळकर, कै. विश्वनाथ केळकर यांच्यानंतर डॉ. श्रीराम केळकर यांच्यारूपाने केळकर घराण्यातील 4थी पिढी “श्रीं”च्या सेवेत कार्य करत आहे. 2009 पासून डॉ केळकर हे पंच म्हणून कार्यरत होते. आता त्यांची सरपंचपदी निवड झाली आहे.अतिशय शांत, प्रेमळ व मनमिळाऊ स्वभाव आणि अत्यंत हुशार व अभ्यासू व्यक्तीमत्व असलेल्या केळकर यांची निवड संस्थान श्रीदेव गणपतीपुळे च्या पंचकमिटीवर झाल्याने संपूर्ण मालगुंड व गणपतीपुळे परिसरातून विशेष समाधान व्यक्त होत आहे.