(रत्नागिरी)
माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज नाणीज मधील विद्यार्थी कु. कार्तिक चंद्रशेखर साळवी याची धाराशिव येथे होणार्या ‘महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा 2024’ या स्पर्धेसाठी जिल्हा कुमार संघामधून निवड झाली आहे. 20 ऑक्टोबर रोजी डेरवण येथे खो – खो फेडरेशन ऑफ इंडिया मार्फत झालेल्या रत्नागिरी जिल्हा कुमार खो – खो अजिंक्य पद व निवड चाचणी स्पर्धेत कार्तिकने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. तसेच या आधीही शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचा नुकताच गौरव करण्यात आला होता.
कु. कार्तिक याच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री प्रशांत कदम व इतर संस्थाचालक तसेच मुख्याध्यापिका सौ. रुपाली सावंत देसाई व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक – शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांनी त्याचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच नाणीज हायस्कूल मधील विद्यार्थिनी कु. मंजिरी गावडे ही डेरवण येथे झालेल्या विभाग स्तरीय स्पर्धेमध्ये तिहेरी उडी व पुणे (बालेवाडी) येथे महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन तर्फे झालेली राज्यस्तरीय ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये 1000 मी धावणे प्रकारामध्ये खेळून आली होती. नाणीज हायस्कूलच्या या यशाबद्दल परिसरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.